करिअरजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशाची संधी

जळगाव, दि.२५एप्रिल २०२५ |खान्देश लाईव्ह न्यूज|एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्यामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता १ ली मध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी यासाठी २८ एप्रिल, २०२५ ते १५ मे, २०२५ या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत आणि सुट्टीचे दिवस वगळून खालील ठिकाणी जमा करावेत.
अर्ज मिळवण्याचे आणि जमा करण्याचे ठिकाण:
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह, रावेर, बऱ्हाणपुर रोड, व्ही.एस.नाईक कॉलेज ता.रावेर जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह जुने, महात्मा गांधी कॉलेज कॅम्पस, हॉटेल श्रीनाथ शेजारी, तिरंगा चौक, चोपडा ता. चोपडा जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह, पंचायत समिती जवळ, मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह, बोदवड रोड, नायरा पेट्रोल पम्प, जामनेर ता. जामनेर जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह नवीन, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ परिसर, बांभोरी जळगाव, जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह चाळीसगाव, सप्तशृंगी नगर, टाकळी प्र.चा., भडगाव रोड, अभिनव शाळेसमोर चाळीसगाव जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह एरंडोल, म्हसावद रोड ,शासकीय गोदामा जवळ ता. एरंडोल जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह अमळनेर, अमळगाव रोड , रेल्वेगेट जवळ ता. अमळनेर जि.जळगाव
याव्यतिरिक्त, इच्छुक लाभार्थी http.itdp yawal.in या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात.
प्रवेशासाठी आवश्यक पात्रता:
इयत्ता १ ली साठी जन्मदाखला ग्रामसेवक , इ. १ ली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय ३१ डिसेंबर २०२५ रोजी किमान ६वर्षे पूर्ण असावे.जन्म दिनांक ०१/०७/२०१८ ते ३१/१२/२०१९ या दरम्यान झालेला असावा. पालकाचे वार्षिक उत्पन्न १.०० लाख रुपये पेक्षा जास्त नसावे तसेच पालक शासकीय/ निमशासकीय सेवेत नसावे. उत्पन्नाचा दाखला प्रत जोडणे आवश्यक, उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा सन २०२४-२५, पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र ,विद्यार्थ्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (सक्षम अधिकाऱ्याने दिलेले) ,दारिद्रयरेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमूद करून ग्रामसेवक यांचा दाखला, महिला पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता असल्यास ग्रामसेवकाचा दाखला , विद्यार्थ्यांचे पासपोर्ट साईज दोन फोटो, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड छायांकित प्रत निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही याबाबत पालकाचे हमीपत्र. अनुसूचित जमातीच्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button