करिअरजळगावताज्या बातम्या
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुळजी जेठा महाविद्यालय अभ्यासकेंद्रात पदवीच्या प्रवेशाला सुरू.
जळगांव |
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुळजी जेठा महाविद्यालय अभ्यासकेंद्रात पदवीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष बी. ए (मराठी माध्यम) व बी. कॉम (इंग्रजी व मराठी माध्यम) सह पदव्युत्तर पदवी , एम. ए-लोकप्रशासन आणि रसायन-शास्त्र या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू झाले आहेत. या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशांची मुदतवाढ झालेली असून विनाविलंब अंतिम मुदत १५/०८/२४ आहे. विद्यार्थ्यांनी सदर मुदतीच्या आत आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी मु. जे. महाविद्यालयातील श्री. प्रवीण बारी यांचेशी अभ्यासकेंद्रात जाऊन संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रप्रमुख डॉ. स. ना. भारंबे यांनी केलेले आहे.