महाराष्ट्रकरिअरजळगावताज्या बातम्या
नाशिक विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांसाठी जळगाव संघ सज्ज!

जळगांव |
नाशिक विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ शुक्रवार, ७ फेब्रुवारी २०२५ रोजी धुळे येथे होत आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या महसूल क्रीडा संघातील खेळाडू उत्साहाने सहभागी होत आहेत.
जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना नैपुण्यपूर्ण खेळ साकारण्यासाठी तसेच विजयश्री मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर
मुक्ताईनगर आमदार मा. चंद्रकांत पाटील,
अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे,
जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड,
जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्रकुमार पाटोळे
जिल्ह्यातील सर्व खेळाडू यावेळी खेळाडूंच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून त्यांच्या विजयाच्या मार्गाची सुरुवात करण्यात आली.
सर्व खेळाडूंना जळगाव जिल्ह्याच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्यात.