चोपडाजळगावताज्या बातम्याराजकारण

प्रा .चंद्रकांत सोनवणे यांच्यासह अधिकारी नुकसानग्रस्त शेतांच्या बांधावर ; तात्काळ पंचनाम्यांचे दिले आदेश

चोपडा, खान्देश लाईव्ह न्यूज|
चोपडा तसेच यावल परिसरात अवकाळी वादळ व पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची पाहणी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी केली व अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोडे, प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अनिल विसावे, कृषी अधिकारी आर.एन.पाटील, कृषी सहायक मंडळ अधिकारी व तलाठी तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत होती. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याकडुन देण्यात आल्या. यावेळी गावातील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button