ताज्या बातम्याजळगावमहाराष्ट्र

आम्ही सुखी ह्यापेक्षा सर्व सुखी ही लोकभावना मनात आणा, त्यानुसार जीवनाकडे बघा - शासनदीपक परमपुज्य श्री सुमितमुनिजी महाराज साहेब

जळगांव |
सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर चार मार्गाने समजून घेता येते. आपल्या पेक्षा लहान असेल त्याकडे बघून जगा, मोठ्यांकडे पाहून पुढे यशस्वी व्हावा, चांगल्यासाठी नेहमी प्रयत्न करत रहा तसेच जे चुकिचे होईल त्यासाठीसुद्धा तयार रहा यामधून सुखी जीवनाची कला शिकता येते. युगात तुलना दुसऱ्यांशी आणि स्पर्धा हे दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. भ्रष्टाचार टाळा आणि सहनशिल बना,असे विचार आरंभी परमपूज्य श्री. भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी सांगितले.
कुठलाही संघर्ष हा कर्मउदयातून समोर येत असतो. पुर्वजन्माचे ते संचित आत्माचे ते कर्मफळ असते. सुख दुःखाचे स्वागत हे निर्मळ मनाने केले पाहिजे. कारण संघर्ष ज्याठिकाणी नाही त्याठिकाणी उत्कर्ष नाही. साधना आणि संघर्ष प्रत्येक मानवत पाहिजे जेथे नसेल त्याठिकाणी ज्ञानही वाढत नाही. वास्तविक दुःखांपेक्षा काल्पनिक दुःखांनी मनुष्य पिडीत आहे. त्यामुळे दुसऱ्यांकडे बघण्याची दृष्टी आपण सकारात्मक ठेवली पाहिजे. सुख दुःखाशी अतिथीप्रमाणे लोकव्यवहार केला पाहिजे. जे समोर आहे ते महत्त्वाचे असून त्याचा स्वीकार करुन आनंद केला पाहिजे. कारण दुःख हे नेहमी परिस्थितीवर नाही तर मनस्थितीवर अवलंबून असते. मी सुखी, आम्ही सुखी ह्यापेक्षा सर्व सुखी ही लोकभावना मनात आणा, त्यानुसार जीवनाकडे बघा! असा संदेश शासनदीपक परमपुज्य श्री सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी धर्मसभेमध्ये श्रावक- श्राविकांना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button