*मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांचे आंदोलन*
मुंबई |
प्रमाणपत्राबाबत सनदी अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोरच ‘बोगस’ असा उल्लेख केल्याने आदिवासी कोळी समाजाने सह्याद्री अतिथीगृहात रुद्रावतार धारण केले. दरम्यान, सरकारने आदिवासी कोळी आणि अन्य पोटजातींना अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राच्या संदर्भात बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकत, सरकार विरोधात घोषणाबाजी केली. गोंधळ सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांना बैठक गुंडाळावी लागली.
बैठकीदरम्यान, लाभ घेणाऱ्या आणि लाभापासून वंचित असणाऱ्या आरोप-प्रत्यारोप होत गेल्याने गोंधळ प्रचंड वाढला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बैठक८ दिवसात आयोजित केल्या जातील, असे आश्वासन यावेळी दिले.
टोकरे, महादेव, ढोर, मल्हार, डोंगर संवर्गातील कोळी बांधवांना जात प्रमाणपत्रासह वैधता प्रमाणपत्र दिले जात नसल्याने ठराविक घटकांवर अन्याय होत आहे अशी तक्रार करण्यात आली.आदिवासी संशोधन व विकास प्रशिक्षण विभागाचे संचालक राजेंद्र भारूड यांनी प्रशासनाची भूमिका मांडली. त्यांची भूमिका ही आदिवासी कोळी समाजातील घटकावर अन्याय करणारी असल्याचा आरोप कोळी समाज बांधवांनी करताच,आल्याने गोंधळ निर्माण झाला.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार लता सोनवणे, माजी आमदार डॉ. दशरथ भांडे, प्रा. चंद्रकांत सोनवणे, रमेश पाटील यांच्यासह कोळी समाजाचे नेते जगन बाविस्कर, ऍड.अमित सोनावणे,श्रीधर साळुंके,संदीप कोळी,जितेंद्र सपकाळे, मंदा सोनवणे, दिपक तायडे , युगांत जाधव,पंकज रायसिंग,भाऊसाहेब सोनावणे, बी. टी. बाविस्कर,ऋषी सोनावणे आदी उपस्थित होते.