जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

जळगाव, दिनांक .५जून २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी नुकतेच रेल्वे बोर्डाचे चेअरमन श्री. सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील रावेर स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्याची मागणी केली. या बैठकीत रावेर आणि वरणगाव स्थानकांवर स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार गाड्यांचे थांबे देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

श्रीमती खडसे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे तात्काळ मंजूर करण्याची विनंती केली. त्यामध्ये पुढील गाड्यांचा समावेश आहे :
नवजीवन एक्स्प्रेस (गाडी क्र. 12656) – बोदवड थांबा
दानापुर पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. 12150) – रावेर थांबा (पुणे मार्ग)
महानगरी एक्सप्रेस (गाडी क्र. 22177) – रावेर थांबा

रावेर येथे या गाड्यांचे थांबे देण्यात आल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग तसेच सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल, असा विश्वास श्रीमती खडसे यांनी व्यक्त केला.

रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांनी या मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीस रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button