एकता रिटेल किराणा व्यापारी असोसिएशन तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणी पाल्यांचा सत्कार समारंभ संपन्न
जळगांव |
एकता रिटेल किराणा व्यापारी असोसिएशन, जळगांव ची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २८/०७/२०२४, रविवार रोजी दुपारी २.३० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री. दिलीप जैन यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी हॉल, मायादेवी नगर, महाबळ रोड, जळगांव येथे पार पडली. या वार्षिक सभेचे इतिवृत्त, लेखा परिक्षकाचा अहवाल, नफा तोटा पत्रक ताळेबंद, अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली तसेच विशेष सेमिनार व गुणी पाल्यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव येथील प्रसिद्ध नामांकीत स्क्वेअर सर्कलचे संस्थापक, प्रशिक्षक श्री. सतिषजी मंडोरे यांनी डिजीटल दुनिया व पालकत्व या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सभासद व सत्कारार्थी पाल्य उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी मंचावर अध्यक्ष दिलीप जैन, सेक्रेटरी शांतीलाल नावरकर, व मा. अध्यक्ष धर्मेंद्रशेठ जैन, अनिल कांकरिया, ललित बरडिया, शब्बीर भाई भावनगरवाला, ताराचंद कृपलानीा, सचिन छाजेड उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी ते साठी सर्व एकता रिटेल किराणा असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले.