डॉ. राजेंद्र भारूड यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याने आदिवासी विभागात प्रचंड खळबळ..
जळगाव |
मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीत आदिवासी कोळी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी आदिवासी विकास व संशोधन प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ.राजेंद्र भारूड यांच्या विरोधात जळगावत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत दि. 6/08/2024 रोजी आदिवासी टोकरे, मल्हार, महादेव कोळी जमात बांधवाची बैठक सह्यादी अतिथीगृहात झाली होती. त्या बैठकीत आदिवासी विकास व संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ राजेंद्र भारूड यांनी आदिवासी कोळी जमाती बाबत अपमानजनक व्यक्तव्य केले, त्यामुळे सभेत गोंधळ आणि तणाव निर्माण झाला.त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना बैठक गुंडाळावी लागली होती. स्वतः मुख्यमंत्री आणि उपस्थित मंत्री तसेच आमदारांनी भारूड यांच्या बैठकीतील वागणुकी आणि भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
डॉ भारूड यांच्या विरोधात जळगावातून ऑनलाईन पोलीस तक्रार पंकज रायसिंग यांनी दिनांक 9/08/2024 रोजी दाखल केली आहे. प्रवर्तन बहूदेशिय संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाठ यांनी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून त्यांनी ऑफ लाईन तक्रार दाखल केली.यावेळी मदन शिरसाठ मंगला सोनवणे, , तुषार सैंदाणे, पंकज सोनवणे, भगवान सोनवणे, दिप्तेश सोनवणे, विशाल सपकाळे, ऋषिकेश सोनवणे, संदीप कोळी, बाळासाहेब सैंदाणे, पंकज रायसिंग, दीपक तायडे, गुलाब बाविस्कर, लीलाधर
कोळी, डिगंबर सोनवणे, निखिल सपकाळे, जयेश कोळी, सुभाष सोनावणे आदी उपस्थित होते.