बंदच्या हाकेला जळगाव बाजारपेठेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव |
बांगलादेशात हिंदूं समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती. तसेच लहानमोठ्या किराणा व्यावसायिक, हातगाडी विक्रेते, रिक्षा व्यावसायिक आदींनी बंदला पाठिंबा देऊन आपला प्रतिसाद दिल्याने बंद पाळण्यात आला.
बंदचा फटका एसटी महामंडळालाही बसलेला दिसून येत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत एसटी महामंडळाच्या बस स्थानकावर असलेली गर्दी शुक्रवारी मात्र विरळपणे दिसून येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे.
शहरातील प्रमुख बाजार पेठ बंद –
शहरातील सुभाष चौक, सिंधी कॉलनी येथील भाजी बाजार, दाणा बाजार, सराफ बाजार, फुले मार्केट, गांधी मार्केट, बीजे मार्केट, गोलाणी मार्केट, यासह विविध व्यापारी संकुले बंद असल्याचे दिसून आले.तसेच शहरात तुरळक वाहतूक दिसून आली. ठिकठिकाणी बंदचे पडसाद उमटून आले. यावेळी पोलिसांतर्फे मुख्य चौकांमध्ये चोख बंदोबस्थ ठेवण्यात आला होता. पथकाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यात येत होती.