संत नरहरी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
शिरसोली |
जीवनात कायम चांगले कर्म करण्याचा प्रयत्न केले पाहिजे यात समाजाचे हित आहे, हे सर्व संतांचे एकच विचार होते. सर्वांनी राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी काम करावे. समाजासाठी काम करताना सामाजिक बांधिलकी कायम जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन जळगाव शहराचे आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी व्यक्त केले.
प्रस्तावनेमध्ये अध्यक्ष भगवान सोनार यांनी कार्यक्रमचा उद्देश स्पष्ट करून, सोनार समाजातील विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकजूट राहण्याचे आवाहन केले. यानंतर संजय विसपुते आणि लक्ष्मण पाटील यांनी मनोगत व्यक्त करून, संत नरहरी महाराज यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समाज बांधवांनी पुढे न्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, माजी पंचायत समिती सभापती श्रावण ताडे, उपसरपंच शाम बारी, ग्रा प. सदस्य रामकृष्ण काटोले, अॅड. विजय काटोले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संत नरहरी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या अनिल सोनार, समाधान सोनार, कैलास सोनार, दिपक अहिराव, संजय सोनवणे, संजय सोनार, मुकुंदा विसपुते, विलास सोनार, गजानन दुसाने, राजू अहिराव यापदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.