आयुष्यात येणाऱ्या दुःखाच्या विणकामाशिवाय सुखाचा ‘सदरा’ हा अशक्य – डॉ. आनंद नाडकर्णी
जळगाव |
दुःखाच्या विणकामाशिवाय सुखी माणसाचा सदरा शक्य नाही. त्यासाठी उपभोग, प्राप्ती, मालकी याचा विस्तार करून गांधीजींच्या तत्त्वाप्रमाणे विश्वस्ताची भूमिका आपल्याला करावी लागेल तरच ते शक्य आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि वक्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.
रोटरी क्लब जळगावच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गंधे सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत
होते. यावेळी प्रा.डॉ. सीमा जोशी व प्रा. डॉ. शमा सराफ यांनी डॉ. नाडकर्णी यांच्या सोबत संवाद साधला. व्यासपीठावर अध्यक्ष अॅड. सागर चित्रे व माजी सचिव अॅड. हेमंत भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. नाडकर्णी यांनी मी, तू, आम्ही, तुम्ही यात संपूर्ण जीवनशैली अडकली आहे. प्रत्येकाला उपभोग, प्राप्ती, मालकी यातून तात्पुरते, क्षणिक सुख मिळत असते. ते दिखाऊ की टिकाऊ हा भेद करता येणारी विवेकबुद्धी आवश्यक असल्याचे यावेळी ते म्हणाले.