महाराष्ट्रताज्या बातम्या
खासदार सुप्रिया सुळे यांची धुळे शहरात महाविकास आघाडीची बैठक संपन्न.
धुळे |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा संसदरत्न खासदार माननीय सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज धुळे शहरात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला काँग्रेस, शिवसेना(उबाटा), समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्ट पार्टी,राष्ट्रीय जनता दल यासह धुळे शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित होते. धुळे शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांनी सदर बैठकीचे आयोजन केले होते.