जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

२५ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील हा रस्ता राहणार बंद, पर्यायी मार्गात बदल

जळगाव ।
राज्यस्तरीय लखपती दीदी कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाकरिता दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव विमानतळ समोरील इंडस्ट्रीयल पार्क येथे येणार सभा होणार असून या सभेकरिता राज्यातुन तसेच जिल्हयातून विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला व नागरीक मोठ्या संख्येने येणार आहेत. सभा कार्यक्रम स्थळ हे जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्ग क्रमांक ७५३ एफ वर असल्याने सदर मार्गावरील रहदारीचे नियमन व कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये याकरीता जळगाव शहरातील व जिल्हयातील वाहतुक मार्गामध्ये तात्पुरते बदल करणे आवश्यक आहे.
जिल्हा जळगाव मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३३ (१) (बी) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जळगाव शहरातील पुढील ठिकाणी आणि वेळी सर्व प्रकारच्या वाहनांच्या विनिमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुढील प्रमाणे आदेश देत आहे. रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी अतिमहत्वाचे व्यक्ती (व्हीव्हीआयपी) यांचा जळगाव जिल्हा दौरा-सभा कार्यक्रम आयोजिक करण्यात आलेला आहे. तरी जळगाव शहर व जिल्हयातील खालील नमुद ठिकाणी दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी सकाळी ०७.०० ते सायं १८.०० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची (अत्यावश्यक सेवा वगळून) तात्पुरते मार्गात बदल व मार्ग बंद करीत आहे.
रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ०७.०० वा पासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळ ते नेरी, ता. जामनेर हा मार्ग सर्व प्रकारच्या अवजड व हलके वाहनांना येण्यास व जाण्यास बंद राहिल.

पर्यायी मार्गात तात्पुरता बदल जळगाव कडुन नेरी, पहुर, छत्रपती संभाजीनगर कडेस जाणा-या वाहनांनी जळगाव शिरसोली वावडदामार्ग – नेरी यामार्गाचा जाण्यासाठी वापर करावा. तसेच छत्रपती संभाजीनगर, पहुर, जामनेर कहुन येणा-या वाहनांनी नेरी वावडदा – शिरसोलीमार्ग जळगाव या मार्गाचा येण्यासाठी वापर करावा, नेरी, गाडेगाव, उमाळा चिंचोली, देव्हारी, करमाड, पळासखेडे, जळके (तांडा) या गावाकडुन जळगावला येणा-या वाहनांसाठी वावडदा, शिरसोली मार्गे जळगाव या पर्यायी मार्गाचा सायंकाळी 6 वाजेपर्यंत वापर करावा, असे आवाहन डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button