ताज्या बातम्याजळगावमहाराष्ट्र
आज श्री शिवमहापुराण कथेत शिव-पार्वती विवाह सोहळा सजीव आरास
जळगाव |
पांजरपोळ गोशाळेतील शिवमहापुराण कथेत गुरुवारी देवदत्त महाराज यांनी कथेद्वारा शिव माहात्म्य, बेलपत्राची महती, भस्माचे महत्त्व, रुद्राभिषेकाचे महत्त्व यावर विवेचन केले. दरम्यान, शुक्रवारी कथेत शिव-पार्वती विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून, कथेदरम्यान शिव-पार्वती विवाह सोहळ्याची सजीव आरास दाखवली जाणार आहे. यात शिवमहापुराण कथेतीलच भाविक सहभागी होणार आहेत. शिव-पार्वती विवाहात शहरातील भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी केले आहे.
उद्या दिनांक २४ रोजी महारुद्राभिषेकाचे आयोजन सकाळी ८ ते १० या वेळेत करण्यात आले आहे. तसेच श्री शिवमहापुराण कथेत महा रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान दररोज होणाऱ्या रुद्राभिषेकात भाविक सहभागी होत आहेत. गुरुवारी १०० भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.