श्रीकृष्ण मंडळाने यंदा सात थर रचून फोडली दहीहंडी..
जळगाव |
ढोल ताशांचा तालावर बालगोपालांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच उत्तराहात दहिहंडीचा उत्सव मंगळवारी साजरा केला. गेल्या ५३ वर्षां पासून परंपरा असलेल्या सुभाष चौक मित्र मंडळ आणि सागर पार्क येथील एल. के. फाऊंडेशन आयोजित दहिहंडी उत्सवात ‘सात’ थरांचे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित झाले. श्रीकृष्ण मित्र मंडळाने यापूर्वीचे सहा थरांचे रेकॉर्ड मोडीत काढत एक लाख ५२ हजारांचे बक्षिस मिळवले.
सुभाष चौक: सुभाष चौक मित्र मंडळाच्या ५६ वर्षांत प्रथमच जुन्या गावातील श्रीकृष्ण मित्र मडळाच्या गणेश जाधव या गोविंदाने सातव्या थरावरून दहिहंडी फोडून इतिहास रचला. पहिल्या सलामीला थोडक्यात हुलकावणी मिळाल्यानंतर दुसऱ्यादा मिळालेल्या संधीत पथकाने दहिहंडी फोडली.
नवीपेठ : नवीपेठ मित्र मंडळाने दहिहंडीचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले. गोपाळपुरा गोविंदा पथकाने पाच थर लावत दहिहंडी फोडली, कार्यकत्यांनी जल्लोष केला, युवा गर्जना ढोलताश पथकाच्या २०१ वादकांनी सलामी दिली. माजी महापौर नितीन लढा, मुकेश टेकवानी, यांनी दहिहंडीचे पूजन केले.
जीएस ग्राउंड : भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित भाणि युवाशक्ती फाउंडेशन आयोजित तरूणींच्या दहिहंडी महोत्सवात नुतन मराठा महाविद्यालय, अॅड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, मु.जे. कॉलेज एनसीसी, केसीई मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, किड्स गुरूकुल इंटरनॅशनल शाळा, जी. एच. रायसोनी कॉलेजचे महिला गोविंदा पथक या उत्सवात सहभागी झाले.