जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
भास्कर मार्केट मध्ये हॉटेलमध्ये गोळीबार एलसीबीकडून गुन्हेगारांचा शोध सुरू
जळगाव |
शहरातील भास्कर मार्केट समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये टेबलावर बसलेल्या एका तरुणाने गोळीबार केल्याची घटना काल दिनांक २७ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस तपास सुरू झाला आहे.
जळगाव शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या एका बियर बारमध्ये काही तरुण मंगळवारी मद्यप्राशन करीत बसले होते. ७ वाजेच्या सुमारास एका तरुणाने टेबलाच्या खाली १ राउंड फायर केला. गोळीबार नंतर लागलीच सर्वजण हॉटेल बाहेर निघून गेले.
सदर घटना हॉटेलमध्ये लगेच लक्षात आली नाही. अंदाजे तीन तासांनी जिल्हापेठ पोलीस त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली. हॉटेलमध्ये रिकामा राऊंड सापडला असून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून,दरम्यान, फायरिंग करणारा व इतरांची ओळख पटली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे.