जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
जळगावात कविसंमेलन जागवणार भिडे वाड्याच्या स्मृती
जळगाव |
मुलींच्या पहिल्या शाळेच्या भिडे वाड्याच्या स्मृती कविसंमेलनामुळे पुन्हा जागवल्या जाणार आहेत. ‘भिडे वाडा मुलींची पहिली शाळा’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानाची सुरुवात पुणे येथील कवी विजय वडवेराव यांनी केली आहे. या अंतर्गत जळगावात रविवारी (दि. १), सकाळी ९ ते १ या वेळेत आयएमआर कॉलेजमध्ये
कविसंमेलन होणार असून,
भिडे वाडा हे आंतरराष्ट्रीय स्मारक हे स्त्री शिक्षण प्रसाराचा केंद्रबिंदू असल्याची माहिती तरुण पिढीला मिळणार आहे. कवी मुकुंद जाधव, ईश्वर वाघ, ज्योती वाघ, छाया सोनवणे, आशा सोनवणे, इंदिरा जाधव, गंगा सपकाळे, ज्योती राणे, अशोक पारधे परिश्रम घेत आहेत. उपस्थितीचे आवाहन आर. जे. सुरवाडे, सुधीर महाजन, नंदा सोनवणे यांनी केले आहे.