सप्टेंबर महिन्यात तब्बल १० दिवस बँका राहणार बंद…
जळगाव |
सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. आजपासून म्हणजेच १ सप्टेंबरपासून देशभरात अनेक नियमांत बदल होणार आहेत. बँकिंग क्षेत्रातही काही बदल झाले आहेत. या सप्टेंबर महिन्यात बँकांना १०दिवस सुट्ट्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात शनिवार, रविवार मिळून एकूण तब्बल १० दिवस बँका बंद असणार आहे. सप्टेंबर महिन्यात तुम्हाला बँकांशी संबंधित काही काम करायचे असेल.
बँकेच्या सुट्टीच्या दिवशी तुम्हाला फक्त बँकेत प्रत्यक्ष जाऊन काम करता येणार नाही. बँकेच्या या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही बँकेसंदर्भातील कामाचे नियोजन आखावे.
१ सप्टेंबर: रविवार,
२ पोळा,
७ सप्टेंबर: गणेश चतुर्थी,
८ सप्टेंबर,रविवार,
१४ सप्टेंबर: दुसरा शनिवार,
१५सप्टेंबर: रविवार,
१६ सप्टेंबर: इद ए मिलाद ,
२२ सप्टेंबर: रविवार,
२८सप्टेंबर : चौथा शनिवार,
२९ सप्टेंबर: रविवार.
ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू
या सुट्यांमध्येही प्रत्येकजण ऑनलाइन आणि डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतो. याचा अर्थ असा की ग्राहक त्यांचे बँकिंग व्यवहार ऑनलाइन फंड ट्रान्सफर आणि मोबाइल बँकिंग ॲप्सद्वारे शकतात.