कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राचा विषय मार्गी लावा : अंबादास दानवे
सोलापूर |
आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या ३१ जिल्ह्यांतील महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जातवैद्यता प्रमाणपत्रासंदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात संबंधित खात्याचे अधिकारी, समाजाचे अभ्यासक व शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्यासमवेत बैठक झाली. त्यामध्ये ना. दानवे यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सहआयुक्तांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कडक फैलावर घेतले.
यावेळी कोळी जमातीचे अभ्यासक डॉ. शरण खानापुरे यांनी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्रा संदर्भात अधिकारी कशा पद्धतीने अडवणूक करतात तसेच ब्रिटिश कालीन सेन्सेस रिपोर्ट, मानववंश शाखज्ञांचे अहवाल, हायकोर्टाचे जजमेंट, एसबीसी व एसटी मधील कोळी नेमके कोणते, मंत्रीमंडळ ठराव,
यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊ नका ना. दानवे
ना. अंबादास दानवे यांनी कोळी समाजाच्या जातपडताळणीमधील अडचणीसंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांच्याकडून दिशाभूल करणारी उत्तरे मिळाल्यामुळे ना. दानवे यांचा पारा चढला. हा समाज गरीब, अज्ञानी आहे म्हणून त्यांच्यावर अन्याय करता का? असा सवाल करत त्यांना फैलावर घेतले. आदिवासी विभागाचे अव्वर सचिव पावरा यांना चार दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले. एका मिटिंगमध्ये हा विषय संपणार नसून, अजून एक-दोन मिटिीग घेऊन कोळी जमातीचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
२०११ ची जनगनना, विधानसभा, ९.३५ टक्के फंडाची तरतुद, लोकसभा आरक्षण, यानुसार महाराष्ट्रात १९५० पूर्वीच्या सर्वांच्या
नोंदी फक्त कोळी झाल्या. त्या तत्कालीन जनगणना आयोगाच्या आदेशाने झाल्या आहेत. त्यामुळे टीएसपीतील कोळी जमातींना कोळी नोंदीवरून जसे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र दिले जाते तसेच ओटीएसपीमधील कोळी जमातीलाही देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी सामान्य प्रशासन, विधी
व न्याय विभागाचे अधिकारी, आदिवासी विभागाचे अव्वर सचिव पावरा, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे जॉईन्ट सेक्रेटरी चंचल पाटील, राज्यातील आठ जात पडताळणी समितीचे सहआयुक्त, प्रा. बाळासाहेब बळवंतराव, दत्ता सुरवसे, दुर्गा माने, शाम कोळी, किरण कोळी, गीताजंली कोळी, सुरज खडाखडे, औदुंबर कोळी, परमेश्वर कोळी, शैलेश साळुंखे, सिध्दार्थ कोळी, माधव बुधवारे यांच्यासह राज्याच्या ३१ जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते.