आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नातून चोपडा विधानसभा मतदार संघात दोन कोटींचे कामे मंजूर
चोपडा |
विधानसभा मतदारसंघासाठी आमदार सौ लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अथक प्रयत्नांतून रस्ते व पुल दुरुस्ती परिक्षण योजनेंतर्गत रस्ते विकास मजबुतीकरण करण्यासाठी सन २०२४-२०२५ करीता दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे.ना. गिरीश महाजन यांना याकामी आमदारांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता त्यामुळे ना. महाजन यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
माजी आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे आ. सौ. लता सोनवणे
चोपडा तालुक्यातील बुधगाव ते प्राथमिक शाळा इजिमा ७ ला मिळणारा २ किमी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ५० लाख, विरवाडे ते विष्णापुर रस्त्यावर मोठ्या पुलांसह १ किमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १कोटी ५० लाख (दिड कोटी) अशा या दोन कामांसाठी सदर निधी मंजुर झाल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. लवकरच या कामांची निविदा प्रकाशीत होऊन या कामांना तात्काळ सुरुवात होईल असे आमदार लता सोनवणे यांनी सांगितले.