महाराष्ट्रजळगावताज्या बातम्या

ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने गणरायाचे आगमन

जळगांव |
प्रतिनिधी,
*प्रसाद गणेश कुलकर्णी*

ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने संभाजी नगर परिसरात जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण दिसून आले.
संभाजी नगर सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने दि.७ सप्टेंबर रोजी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
तत्पूर्वी, मिरवणुकीनंतर पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात भक्तगण यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली.
•गणेशोत्सव काळात कार्यक्रमांची रेलचेल –

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संभाजी नगर परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे.या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. डान्स,नाटक, संगीत, कीर्तन,रांगोळी, भजन,चित्रकला आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान करण्यात आले आहे. गणेशोत्सवात मोठया प्रमाणात नागरिकांचा सहभागी होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button