भाजपा अनुसूचित जमाती तर्फे टोकरे कोळी प्रमाणपत्र मिळावे म्हणून अत्तरसिंग आर्या यांना निवेदन*
चोपडा |
सरकार अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष
अत्तरसिंग आर्य हे जिल्हा दौऱ्यावर असतांना चोपडा येथील भेटीदरम्यान कोळी समाजावर अनुसूचित जमाती प्रमाणातबाबत होणाऱ्या अन्यायाबाबत भाजपा अनुसूचित जमाती मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले असून बापाचा जातीचा दाखला असेल तर मुलाला शाळेतच दाखला देण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली.
ही मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष मगन बाविस्कर यांनी श्री .आर्या यांच्याकडे निवेदनाद्वारे करून विविध समस्यांवर चर्चा केली.या मागणीस इतर समाज बांधवांनी देखिल मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला.
याप्रसंगी अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष मगन बाविस्कर,माजी सभापती आत्माराम माळके,तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील,शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील,यावल मंडल प्रभारी प्रदिप पाटील अनुसूचित जाती प्रदेश सदस्य पिंटु पावरा,माजी पं स. सदस्य भरत बाविस्कर,जेष्ठ नेते राजेंद्र पाटील ,तालुका सरचिटणीस विजय बाविस्कर
यांच्यासह भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.