एमपीएससी मार्फत विद्यापीठात होणार प्राध्यापकांची भरती
जळगाव |
महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरती केली जाणार असून तशी माहिती राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिली. तसेच याबाबत आयोगाला सूचनाही देण्यात येणार आहेत.
राज्यातील विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापकांच्या जागा रिक्तच आहे. त्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने आडकाठी येते; परंतु आता विद्यापीठांतील शिक्षणाचा दर्जा कायम राहावा किंबहुना ती अधिकाधिक सुधारणा व्हाव्यात यासाठी आता विद्यापीठांतील रिक्त
असलेल्या प्राध्यापकांची भरती
एमपीएससीद्वारेच केली जाणार आहे. विशेष म्हणजे याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चाही केल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून राज्यातील नेट-सेटधारक पीएच.डी.धारक उमेदवारांची तसेच तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्याच्या स्थितीत विद्यापीठांसह महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयांमध्ये एकूण २० हजारापेक्षा जास्त पदे रिक्त असून त्या भरण्याची शक्यताही वाढली आहे.