राहुल मिस्त्री युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित मूर्ती संकलन केंद्रात २००० गणेश मूर्तीचे विसर्जन
माजी उपमहापौर डॉ.आश्विन सोनवणे यांची संकल्पना
जळगांव |
गणपती बाप्पा मोरयाचा गजर, पुढच्या वर्षी लवकर या अशी घातलेली साद, फुलांची उधळण आणि भावभक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. दरम्यान जळगावकरांनी यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत निर्माल्य दान केले. शहरातली रामानंद नगर परिसरात मध्ये
‘राहुल मिस्त्री युवा प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित मूर्ती संकलन केंद्रात भाविकांची गर्दी दिसून आली. घरगुती गणपती विसर्जन दिनी जिल्ह्यात राबविलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव अंतर्गत मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत एकूण २००० च्यावर गणेश मूर्ती संकलित झाल्या होत्या. तसेच हार, फुले, दुर्वा व अन्य साहित्य मिळून ५ टन निर्माल्य प्राप्त झाले.
शहरात अनेक पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम साजरा होत आहे. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जित मूर्ती व निर्माल्य दान करण्यात येते. यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी आवाहन केले होते. जळगांव शहर प्रदूषण मुक्तीसाठी साथ देण्याचे हाक दिली होती.
पर्यावरणपूरक गणेशाेत्सव उपक्रमामध्ये शहरातील नागरिकांनी सहभागी होवून जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवण्याचे आवाहन माजी उपमहापौर आश्विन सोनावणे यांनी केले,त्यांच्या बैठकांच्या माध्यमातून उपक्रमाचे नियोजन केले. तसेच महानगरपालिकेने सुविधा निर्माण करून केलेल्या मेहरून तलावात गणेशमुर्ती विसर्जन करण्यात आल्यात.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सदस्य ज्ञानेश्वर बारी, संतोष पाटील, छोटू बाविस्कर, कैलास बारी, सागर बारी, उदय बारी, यांनी परिश्रम घेतले.