गिरीश महाजनांविरुद्ध शरद पवारांचे मराठा कार्ड
जळगाव |
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीकडून मोचेबांधणी सुरू आहे. मात्र, जामनेर तालुक्यात भाजपचे संकटमोचक’ मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात आघाडीकडे उमेदवारच नसल्या कारणाने शरद पवार यांनी भाजपमधील ३५ वर्षे काम करणारे ज्येष्ठ सदस्य दिलीप खोडपे यांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले आहे. आता खोडपे यांना उमेदवारी देऊन महाजन यांच्यासमीर मराठा उमेदवार देण्याची खेळी
मागील विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदासंघातून राष्ट्रवादीकडून संजय गरुड यांनी भाजपचे गिरीश महाजन यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात गरुड यांना पराभव झाला होता.मात्र त्यानंतर संजय गरुड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी परिस्थिती ओळखून आता. खोपडे यांचे पक्षात पुनर्वसन करणार आहे.
खोपडे यांनी भाजपचा राजीनामा दिला असून, ते लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश निश्चित आहे. शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा २१ तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होत असून, या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेशाची शक्यता आहे.
मराठा मतासाठी खोडपे प्रभावी
दिलीप खोपडे जळगाव जिल्ह्यातील मराठा नेते म्हणून ओळखले जातात. जामनेर मतदारसंघात एकूण मराठा समाजाचे १ लाख ४० हजार मतदार आहेत. त्यामुळे दिलीप खोपडे हे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
दिलीप खोपडे किती यशस्वी होते हे येत्या निवडणुकीत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जामनेर तालुक्यात महाजन यांना विरोधकच शिल्लक राहिला नव्हता. जळगांव महानगरपालिका निवडणुकीतही भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आल्याने महापालिकेतही विरोधक नाही. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांना जामनेर मतदारसंघातून कोण आव्हान देणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.