जळगावमहाराष्ट्र

बालकांच्या विकासासाठी बालरंगभूमी परिषद सदैव प्रयत्नशील राहणार – निलम शिर्के सामंत

जळगांव |
बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांची महती लहान विद्यार्थी पोहचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ हा महोत्सव राबविण्यात येत आहे. जळगाव शहरात या महोत्सवाचा शुभारंभ आज दि. २१ रोजी बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अभिनेत्री निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
नटराजपूजन आणि दीपप्रज्वलन झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित बालप्रेक्षकांशी संवाद साधतांना निलम शिर्के सामंत म्हणाल्या की, आजच्या युगात कोरोना कालावधी मोबाईलच्या जवळ गेलेल्या बालकांना आपल्या संस्कृती व संस्कारांचे महत्व सांगण्याचे काम बालरंगभूमी परिषद करत आहे. विविध महोत्सवांच्या माध्यमातून आपले महाराष्ट्र राज्य वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण लोककलांनी समृध्द राज्य आहे. या कला विद्यार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात हा उद्देश घेऊन जल्लोष लोककलेचा या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी, शिक्षकांनी मुलांपर्यंत पोहचवलेला हा महोत्सव यंदाच नाही तर दरवर्षी आयोजित केला जाणार असून, जळगावातील मुलांमुलींच्या भरभरुन आलेल्या प्रवेशिकांचा आनंदही झाला आहे. जळगावातील महोत्सवात आजच्या एकल सादरीकरणामध्ये राज्यातील महोत्सवांमधील सर्वाधिक वाद्यवादनाच्या २५ प्रवेशिका आल्या याचे कौतुक जास्त आहे. तसेच गीत गायनात १८ व एकल नृत्याच्या ३० प्रवेशिका हे देखील आशादायक चित्र आहे. मुलामुलींना लोककलांविषयी आवड निर्माण होते आहे.
महाबळ रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात झालेल्या या महोत्सवाच्या सुरुवातीला काव्य रत्नावली चौकातून लोककलेची दिंडी काढण्यात आली. यात नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयातील ९० विद्यार्थिनी तसेच गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिरातील ६० विद्यार्थ्यांनी आपल्या लेझीम व ढोल पथकासह सहभाग घेतला. लोककलेची दिंडी कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर सुरु झालेल्या उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा निलम शिर्के सामंत, ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील, मुंबई शाखेचे कोषाध्यक्ष आसेफ अन्सारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगावच्या कोषाध्यक्ष प्रा. शमा सराफ, स्पर्धेचे परीक्षक प्रा. सुचित्रा लोंढे, अजय शिंदे, धनश्री जोशी, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button