संस्थाजळगावताज्या बातम्याधर्ममहाराष्ट्र
धर्मरथ फाउंडेशनतर्फे गणेश मिरवणुकीतील मंडळांचा गौरव
सहभागी सर्व मंडळांनाही सन्मानचिन्ह
जळगाव |
धर्मरथ फाउंडेशन व महेश चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध गणेश मंडळांना विविध पुरस्कार देण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत सहभागी सर्व मंडळांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमात खडके चाळ मित्र मंडळाला विशेष सामाजिक मंडळ, आझाद क्रीडा मित्र मंडळाला रउत्कृष्ट आरास, अमर चौक मित्र मंडळाला उत्कृष्ट गणराय,
शिवाजीनगर मित्र मंडळाला उत्कृष्ट मिरवणूक, श्री वज्रेश्वरी मित्र मंडळाला उत्कृष्ट मंडळ, शाहूनगर मित्र मंडळाला उत्कृष्ट ढोल-ताशा आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत सहभागी सर्व मंडळांनाही सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. व्यासपीठावर धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, सामाजिक कार्यकर्ते महेश चौधरी, नीलेश भोईटे, शैलेश. पटेल, किशोर पाटील आदी उपस्थित होते.