ताज्या बातम्याकरिअरमहाराष्ट्रराजकारण

चोपडा पंचायत समिती अंतर्गत विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थीच्या निवडीचे आदेश

चोपडा तालुक्याचे आमदार लताताई सोनवणे यांचे शुभहस्ते वाटप

चोपडा|
मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत शासन निर्णय दि. ९ जुलै २०२४ नुसार चोपडा पंचायत समिती अंतर्गत विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थीच्या निवडीचे आदेश रोजी चोपडा तालुक्याचे आमदार लताताई सोनवणे यांचे शुभहस्ते निवड आदेश वाटप करण्यात आलेत.

मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत चोपडा पंचायत समिती अंतर्गत मराठी व उर्दू माध्यमांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळांमध्ये एकूण १२२ प्रशिक्षणार्थी शिक्षकांना व पंचायत समिती अंतर्गत २० ग्रामपंचायतीत युवा प्रशिक्षणार्थी म्हणून निवडीचे आदेश आज रोजी शासकीय विश्रामगृह चोपडा येथे एका शासकीय कार्यक्रमात चोपडा तालुक्याच्या आमदार लताताई सोनवणे यांचे शुभहस्ते वाटप करण्यात आलेत. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पंचायत समितीचे
अतिथी म्हणून माजी आमदार आण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे हे उपस्थित होते.
निवड आदेश वाटप कार्यक्रमात माजी आमदार आण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेत विविध प्रशिक्षणार्थी यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचा लाभ घेवून आपले कौशल्य याबाबतीत विकसित करावे असे आवाहन तरुणांना केले. चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश बाघ साहेब यांनी या योजनेबद्दलचे स्वरुप, कार्यपद्धती, कालावधी व अंमलबजावणीबाबत सविस्तर

माजी सभापती एम.व्ही. पाटील, चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते, सागरभाऊ ओतारी, कैलास बाविस्कर, रावसाहेब पाटील, संचालक गोपाल पाटील शिवराज पाटील, किरण देवराज, विजय पाटील नामदेव पाटील, व कुणाल पाटील गणेश पाटील, दिपक चौधरी, गोरख कोळी अन्नु ठाकुर, हरीष पवार, गणेश पाटील, एस. आर. पाटील सर हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व युवा प्रशिक्षणार्थी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन चोपडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, उत्तम चव्हाण, देवेंद्र पाटील, वैशालीताई पाटील, यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत सोनवणे यांनी केले. कार्यक्रम सशस्वीतेसाठी रबिराज शिंदे, जीवनलाल बाडीले, समन्वयक समाधान कोळी, तालुका पेसा समन्वयक प्रदिप बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button