रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल व आराध्या प्रतिष्ठानतर्फे अबॅकस व वैदिक मॅथच्या १४व्या राष्ट्रीय स्पर्धा
४२५ विद्यार्थ्यांनी ५ मिनिटांत १०० प्रश्न सोडवली
जळगाव |
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल व आराध्या प्रतिष्ठानतर्फे अबॅकस व वैदिक मॅथच्या १४व्या राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या. यात ४२५ विद्यार्थ्यांनी ५ मिनिटांत १०० प्रश्न सोडवली.
लुंकड कन्या शाळेच्या सभागृहात झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन विद्या प्रबोधिनीचे संचालक योगेश पाटील, अॅड. सूर्यकांत देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पारितोषिक वितरण जळगाव मॅट उद्योग संघटनेचे अध्यक्ष महेंद्र रायसोनी, रोटरी सेंट्रलचे मानद
सचिव समर्थसिंग पाटील, पूजा असोदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अबॅकस व वैदिक मॅथच्या टोडलर ते ८ लेव्हल पर्यंतच्या प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अवॉर्ड आणि लकी कॅम्प सायकल अवॉर्डचे चिराग माळी आणि जिज्ञासा गवळी या विजेत्यांना वितरण करण्यात आले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर टिप्स दिल्या. परीक्षक म्हणून विकास सोनवणे यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी शिक्षक-शिक्षिका यांनी सहकार्य केले.