राजकारणजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर
जळगाव |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा कार्यालयात भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, अमित भाटिया, महेश जोशी, अरविंद देशमुख, माजी नगरसेवक जितेंद्र मराठे, विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील उपस्थित होते.
शिबिरात अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. युवा मोर्चाचे सरचिटणीस गजाजन वंजारी, अक्षय जेजुरकर, रोहित सोनवणे, दर्शन सोनवणे, हर्षल चौधरी, आकाश मोरे, उन्मेश चौधरी आदी कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वितेसाठी सहकार्य केले.