महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी विधानसभेला २८८ जागा लढविणार
जळगाव |
महाराष्ट्र स्वाभिमान
पार्टी हि २०२३ साली स्थापन झाली आहे. या पार्टीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीतील सर्व २८८ जागा लढविण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संतोष सपकाळे यांनी गुरुवारी दि. २६ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी हि २०२३ साली
स्थापन झाली आहे. पक्षाचे सर्व जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत. या पक्षातर्फे गोरगरीब, वंचित, महिला, शेतकरी, बालविकास, रोजगार अशा विविध पातळीवर काम करण्यासाठी धोरण आखण्यात आले आहे. जनतेची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी ही आगामी काळात सक्रिय राहणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रचना करण्यात आली आहे. तसेच, विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणूकदेखील येत्या काळात केल्या जाणार आहेत.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण जोरात सुरु झाले आहे. यामुळे राज्यभरात विधानसभेच्या २८८ जागा स्वबळावर लढविण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती सुरु असून स्वबळावर सत्ता येण्यासाठी चाचपणी सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी ही महाराष्ट्रात एक सक्षम पर्याय उभा करीत आहे. राज्याला पुरोगामी तसेच संत व समाजसुधारकांची परंपरा आहे. मात्र महापुरुषांच्या नावाखाली मोठे राजकारण सत्ताधारी व दोन्ही खेळत आहे. आजवर अनेक सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. प्रत्येकाने आपले हित साध्य करण्यासाठी सत्तेत काम केले. मात्र महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी प्रत्येकाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
त्याकरिता सक्षम पर्याय हा महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी आता महाराष्ट्रवासियांना उपलब्ध होणार आहे. पार्टीतर्फे उमेदवारी देताना सर्व वर्गातील उमेदवारांना प्राधान्य देण्याचा आणि संधी देण्याचा प्रयत्न आहे.