घटस्थापना ते विजयादशमी दुर्गामाता दौडचे जळगावच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे आयोजन
जळगाव |
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे घटस्थापना ते विजयादशमी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय शुद्धीकरणाचा मार्ग म्हणून ३ ते १२ ऑक्टोबर म्हणजे घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दररोज सकाळी ५.३० वाजता दौड काढली जाणार आहे.
दौडला शिवतीर्थ मैदानापासून सुरुवात होऊन ती दररोज एका मंदिरात भेट देईल. यासाठी पांढरा कुर्ता, पायजमा, पांढरी टोपी घालून
सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जळगाव विभागाचे धारकरी आकाश फडे यांनी केले आहे.
ही दौड म्हणजे देश जागृती, राष्ट्रभक्ती, तरुणांमध्ये देशाभिमान, शिवछत्रपती संभाजी महाराज यांचे राष्ट्रीय कार्य व भारतीय संस्कृतीची जाणीव करून देणारा मार्ग असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे या दुर्गादौडमध्ये जळगावातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या तर्फे करण्यात आले आहे.