राजकारणजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेसंदर्भात सेविकांची बैठक

आमदार राजूमामा भोळे यांनी महानगरपालिकेत घेतला आढावा

जळगांव |
महानगरपालिकेत दुसऱ्या मजल्यावर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेसंदर्भात आज गुरुवारी दि. २६ रोजी बैठक पार पडली. याप्रसंगी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड, गणेश चाटे, सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड, सुमित जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी गायत्री पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. अंगणवाडी ताईंनी त्यांना आलेल्या विविध अनुभवांची माहिती दिली.
तसेच, या योजनेमुळे महिलांना आर्थिक हातभार लागत असल्याने त्यांनी राज्य सरकारचे आभार मानत आपले अनुभव अंगणवाडी सेविकांनी सांगितले. बैठकीत आ. राजूमामा भोळे यांनी येणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात समजून घेतल्या.
लाडकी बहीण योजनेमुळे महिला सक्षम होत असून त्यामुळे परिवार सक्षम पर्यायाने समाज आणि देश सक्षम होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज न केलेल्या बहिणींनी देखील तत्काळ अंगणवाडी सेविकांकडे जाऊन अर्ज भरावा,म्हणजे त्यांना लाभ मिळेल, असे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले.
योजनेसाठी अर्ज करणाऱ्या बहिणींच्या अर्जावर लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी मनपा अधिकाऱ्यांनीदेखील समस्या जाणून घेऊन जर प्रक्रियेत काही त्रुटी असतील तर लवकरच दूर करण्यात येतील असे आश्वासित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button