शहरात माजी महापौरांचे ‘अपेक्षा नोंदणी अभियान’
जळगाव |
माजी महापौर जयश्री महाजन यांच्यातर्फे जळगाव शहरात आजपासून अपेक्षा नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे. शहराच्या विकासासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबाबतच्या सूचना माजी महापौर जयश्री महाजन यांनी मागवल्या आहेत. २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत अपेक्षा नोंदणी अभियान राबवले जाणार आहे.
जळगाव शहरातील विविध बारा ठिकाणी अपेक्षा जळगाव शहरातील नागरिकांनी आपल्या जवळच्या अपेक्षा नोंदणी केंद्रावर भेट द्यावी, त्या ठिकाणी दिला जाणारा अर्ज भरून द्यावा. जळगावच्या विकासासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, .
मुख्य समस्या काय आहेत, लोकप्रतिनिधींकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याची नोंद करावी.
केंद्र स्थळ
२८ व २९ नोव्हेंबर – नेताजी सुभाषचंद्र चौक, कासमवाडी बाजार, भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, बहिणाबाई उद्यान. ३० नोव्हेंबर, १ आणि २ ऑक्टोबर महानगरपालिका, गोकुळ स्वीट स्टॉप, बेंडाळे कॉलेज स्टॉप, एम. जे. कॉलेज चौक, पिंप्राळा स्टॉप, पांजरपोळ स्टॉप. १ ऑक्टोबर-हरी विठ्ठल नगर बाजार.
प्रत्यक्ष नोंदणी केंद्रावर येणे शक्य नसल्यास मॅसेज करून नोंदणी करू शकतात. आपला अभिप्राय द्यावा असे आवाहन माजी महापौर जयश्री महाजन यांनी जळगावकरांना केले आहे.