“झेंडूचं फुल” नाटकाला जळगावकरांचा प्रतिसाद
आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे नाटकाचे आयोजन
जळगाव |
शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे “झेंडूचं फुल” ही अस्सल लेवा गणबोली भाषेतील, हसता-हसता गंभीर भाष्य करणारी नाट्यकलाकृती सलग दोन दिवस छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दाखविण्यात आली. दोन्ही दिवस प्रचंड प्रतिसादासह जळगावकरांनी उपस्थिती दिली.
स्नेहयात्री प्रतिष्ठान निर्मित “झेंडूचं फुल” हे नाटक वीरेंद्र पाटील यांनी लेखन व दिग्दर्शन करून तयार केले आहे. त्याला राज्यशासनासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यात कलाकारांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचे दाखवून किती हाल अपेष्टा सहन करून तो स्वतःच्या परिवारासह समाज आणि देशासाठी योगदान देत असतो हे प्रभावीपणे सादर केले आहे.
नाटकाच्या सुरुवातीला कलाकारांसह तंत्रज्ञांचा सन्मान खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे यांच्यासह माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेविका रंजना वानखेडे, गायत्री राणे, राजू मराठे, विजय वानखेडे, दीप्ती चिरमाडे यांच्या हस्ते करण्यात आला.