महाराष्ट्रताज्या बातम्या

नाशिक येथे कोळी वरवधु परिचय मेळावा बैठकीचे आयोजन

नाशिक –
दि. २१/०७/२०२४ रविवार रोजी वेदांत मंगल कार्यालय येथे युवामहोत्सव व वरवधु परिचय मेळावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री. नारायण झगू कोळी साकरीकर जळगाव यांचे मेहनतीने व मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले यात श्री. युवराजदसैंदाणे, श्री.संजय शिंदे,किसन सोनवणे यांचे हस्ते गुरूपोर्णिमाचे औचित्य साधून महर्षि वाल्मिकॠषी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कोळी यांनी केले.
या वधूवर परिचय मेळावा बैठकीसाठी जळगाव, धुळे, नाशिक,पुणे,भोपाल, नेपानगर,अशा विविध ठिकाणाहून वधूवर व पालक व समाज बांधव उपस्थित होते. याठिकाणी सर्व समाज बंधू भगिनींनी आपला आपल्या उपवर वधूंचा परिचय करून दिला.
या वधूवर परिचय मेळावा बैठकीत लग्न जमविण्यात काय अडचणी येतात यावर समाज बांधवानी विचार मंथन करणे गरजेचे आहे, यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी समाज कोणताही भेदभाव न करता व रोटी-बेटी व्यवहार न ठेवता आपल्या हातून अपेक्षा प्रमाणे किंवा आपल्या आवडीनिवडींविषयी संबंध जुळून समाजात एकोपा निर्माण करावा.असे सखोल मार्गदर्शन समाजातील जेष्ठ नागरिकांनी केले.पुढील वधूवर परिचय मेळाव्यात वधूवर यांनी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या वधूवर परिचय मेळावा बैठकीत श्री. नारायणदादा साकरीकर जळगाव, श्री. संजयदादा शिंदे, युवराज सैंदाणे, श्री. किसन सोनवणे यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. व स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी कमलेश पुंडलिक रायसिंगे,निलेश आधार सैंदाणे, प्रकाश राजधर कोळी, ज्ञानेश्वर माधवराव सोनवणे, उल्हास शशिकांत सोनवणे, विकास रामदास सपकाळे, कु.शितल प्रताप कोळी, कल्पना जनार्दन सोनवणे, राहूल कोळी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button