महाराष्ट्रजळगावताज्या बातम्या
शहीद भगतसिंग यांची जयंती नौजवान भारत युवक संघटनेतर्फे साजरी
जळगाव |
शहरातील काव्यरत्नावली चौकात शहीद भगतसिंग यांची जयंती नौजवान भारत युवक संघटनेतर्फे साजरी करण्यात आली. यावेळेस शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नौजवान भारत युवक संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी उपस्थित युवकांशी तसेच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच सुश्मिता भालेराव यांनी शहीद भगतसिंग यांचा जीवनपट आपल्या भाषणातून मांडला. या कार्यक्रमाला जयेश सोळंके, मयूर साळवे, करण माळकर, राज पाटील, सचिन आवटे, विशाल पवार, मानसी यादव, गणेश बडगुजर, निर्वेद पाटील, चेतन बडगुजर, लखन चव्हाण, सोपान गरुड उपस्थित होते.