राजकारणजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
गद्दारांनी आम्हाला शिकवू नये- संजय सावंत
जळगाव |
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे माझ्याविरोधात जळगाव ग्रामीण मतदारसंघात कोणताही उमेदवार नाही, अशी टीका शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती .
यावर ठाकरे गटाचे संजय सावंत यांनी, ‘आम्ही आमचे बघून घेऊ, गद्दारांनी आम्हाला शिकवायची अजिबात गरज नाही’, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
गुलाबराव पाटील यांच्या विधानावर ठाकरे गटाचे नेते संजय सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोणाला काय सापडले काय नाही? हे पाहण्यासाठी गुलाबराव पाटील हे दुर्बीण घेऊन फिरत आहेत का? तुम्ही तुमचे बघा, आम्ही आमचे बघू. त्यांनी आम्हाला शिकवू नये. ज्याच्याकडे निष्ठा आहे तो दुसऱ्याला शिकवू शकतो. गद्दार आणि कलंकित माणूस शिकवू शकत नाही’, अशा शब्दांत संजय सावंत यांनी गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिले.