सुराज्यासाठी जातीधर्माच्या चक्रव्युहातून बाहेर पडा – प्रा. श्याम मानव
महाराष्ट्र बचाव-संविधान बचाव अभियान अंतर्गत श्याम मानव यांचे प्रतिपादन
जळगाव |
लोकं जाती आणि धर्मात तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे आपले राज्य आणि संविधान धोक्यात आले आहे. परिणामी जाती धर्माच्या चक्रव्युहातून बाहेर पडून खरे सुराज्य निर्माण करा, भारतात सामाजिक एकोपा नसल्याचा फायदा घेत इंग्रजांनी आपल्यावर दोनशे वर्षे राज्य केले. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील जातीयता मिटवून सर्वसमावेशक संविधानाची निर्मिती केली .
असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख प्रा. श्याम मानव यांनी केले.
अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे बुधवार दि. २ रोजी ‘संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, बिरसा मुंडा क्रांती दलाचे संस्थापक दशरथ मडावी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, दिलीप सपकाळे, करीम सालार, सचिन धांडे, सुरेंद्र पाटील, लीना पवार, ईश्वर मोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सपकाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. झुरमुरे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विनोद सपकाळे यांनी केले.