जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण
पहिल्या जलपर्यटन महोत्सवास प्रारंभ
जळगांव |
महाराष्ट्रातील पहिल्या तीन दिवसीय ‘अॅक्वाफेस्ट’ जलपर्यटन महोत्सवाचे जळगाव शहरातील मेहरूण तलावात राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. देशातील सर्व राज्यांचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी १५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रसंगी केली.
याबाबत प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक बाबी लवकर पूर्ण करून इथे जल पर्यटन सुरू केले जाईल, अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.