शंभर रुपयांचे मुद्रांक बंद मंत्रिमंडळाचा बैठकीत निर्णय
योजनांची सपाट्याची थेट सामान्यांच्या खिशाला झळ
जळगांव |
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांचा पाऊस पाडत असल्याने आर्थिक घडी विस्कटल्याने १००, २०० रुपयांचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घेतला आहे. परिणामी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर होणाऱ्या कामासाठी ५०० रुपयांचा मुद्रांक खरेदी करावा लागणार आहे. परिणामी एका मुद्रांकामागे ४०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. महायुतीच्या लोकप्रिय योजनांची सपाट्याची थेट झळ सामान्यांच्या खिशाला बसत असल्याचे समोर येत आहे.
मुख्यमंत्री लाडका भाऊ, आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा अशा योजना सरकार राबवत आहे.
प्रतिज्ञापत्रे, संचकारपत्र, वाटणीपत्र, पतसंस्था कामी, लग्न नोंदणीवेळी, भाडे, सामंजस्य करार प्रतिज्ञापत्र, खरेदी, विक्री व्यवहाराचे प्रतिज्ञापत्र, करारपत्र, बँक, न्यायालय कामकाजासाठी मुद्रांक लागते.
सरकारच्या तिजोरीवर पडत आहे. परिणामी निधींची कमतरता पडत असल्याने सरकार उत्पन्न वाढीसाठी विविध निर्णय घेत आहे.
जिल्ह्यातील दस्त लेखनिक यांच्याकडून रोज कमीत कमी पाच ते सहा मुद्रांक शंभर रुपयांचे घेऊन जातात. याशिवाय बँका व इतर ठिकाणांहूनही मुद्रांक खरेदी केली जाते.
उत्पन्नवाढीसाठीच शासनाने आता १०० आणि २०० रुपयांचे मुद्रांक बाद ठरवले आहेत. कोणतेही व्यक्तिगत किंवा अन्य दस्त नोंदणीसाठी
रोज सुमारे १० हजारांहून अधिक शंभर रुपयांचे
मुद्रांक विकत घेऊन वापरले जातात. हेच प्रमाण राहिले तर रोज दहा हजार जणांना ५०० रुपयांचे मुद्रांक खरेदी करावे लागले तर ४०० रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.
आवश्यकतेनुसार १००, २०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरून दस्तऐवेज नोंदणीकृत करता येत होता. आता पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत.