कामगार कल्याण मंडळ आयोजित गाठोडयाचं गुपीत हे बालनाटय प्रथम
जळगांव |
जळगाव महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ जळगावमार्फत दि. १ ऑक्टोबर रोजी बालनाटय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत १३ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परिक्षण चितामण पाटील, जगदीश नेवे आणि आकाश बावीस्कर यांनी केले.
स्पर्धेत कामगार कल्याण वसाहत मेहरुण येथील गाठोडयाचं गुपीत हे बालनाटय प्रथम क्रमांकावर तर ललित कला भवन, जळगाव येथील अनईस्टाल नाटकाला व्दितीय क्रमांक मिळाला असून कामगार कल्याण केंद्र, पाचोरा येथील फुलपाखरू नाटकाने तृतीय क्रमांक पटकाविला. कामगार कल्याण केंद्र, पिंप्राळा, जळगाव व कामगार कल्याण केंद्र, दौपनगर भुसावळ या केंद्रातील अनुक्रमे द बटरफ्राय व सोशल मीडिया या नाटकांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली. स्पर्धेतील मुलांच्या अभिनयांच्या बक्षिसांमध्ये प्रणित मोहडकर यांनी प्रथम क्रमांकाचे तर अंश जाधव यांनी व्दितीय क्रमांक मिळविला.श्लोक गवळी यांनी उत्कृष्ट अभिनयाचे तृतीय
क्रमांकाचे बक्षिस मिळविले. स्पर्धेतील मुलींच्या अभिनयांच्या बक्षिसांमध्ये सर्वा जोशी यांनी प्रथम क्रमांकाचे तर निर्गुणी बारी यांनी व्दितीय क्रमांक मिळविला, वैष्णवी नाईक यांनी उत्कृष्ट अभिनयाचे तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळविले. उत्कृष्ठ दिग्दर्शनांत अमोल ठाकूर यांनी प्रथम क्रमांकाचे तर दिशा ठाकुर यांनी व्दितीय क्रमांकाचे बक्षिस मिळविले, कविता पडलवार यांनी उत्कृष्ट दिग्दर्शनाचे तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळवीले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायं. ६ वाजता घेण्यात आला. स्पर्धेच्या पारितोषिक
वितरण समारंभा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील नाटयकर्मी शरद भालेराव हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी झोन सहसचिव कामगार महासंघ, जळगाव अध्यक्ष, विश्वकर्मा सहकारी विज कामगार पतसंस्था, जळगावचे मोहन गारुंगे हे उपस्थित होते. कार्यक्रमास दै. पुण्यनगरीचे सह महाव्यवस्थापक महेत्र माळी यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी यांनी केले. सुत्रसंचालन केंद्र संचालक किशोर पाटील यांनी तर, आभार कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी मानले.