श्री महर्षी वाल्मिक समिती जळगाव जिल्हा बैठक संपन्न
वाल्मीकिंच्या काव्यप्रतिभेने संस्कृत साहित्य बहरले - डॉ.आश्विन सोनवणे
जळगाव |
शहरातील श्री महर्षी वाल्मिक समिती तर्फे “वाल्मीकी जयंती” मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा ठराव करण्यात आला.
आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच १७ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे.
वेळी कैलाश सोनवणे आणि डॉ.आश्विन यांनी
सोहळ्याचा मार्ग आणि इतर व्यवस्था कशी असेल या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
महर्षी वाल्मीकी उत्सव समिती शहरात दरवर्षी महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रम आयोजिन करते. यावेळीही भव्य कार्यक्रम होणार आहे. ज्याची संपूर्ण जबाबदारी समाजातील कार्यकर्ते सांभाळतील.
सजवलेल्या रथातून महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रम , लेझिम पथक आकर्षणाचा विषय ठरणार आहे.
कैलास सोनवणे यांनी समितीला मार्गदर्शन केले.
या बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, माजी उपमापौर आश्विन सोनवणे, किशोर बाविस्कर, सूर्या सोनवणे यासह समाज बांधव उपस्थित होते.