जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

कोळी समाज शिस्टमंडळाची जिल्हाधिकारी यांचा सोबत बैठक

जळगाव : आदिवासी टोकरे कोळी, महादेव, मल्हार, ढोर कोळीबांधवांना जात प्रमाणपत्र दाखला देण्यासाठी सातत्याने टाळाटाळ होत असल्याने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोळीबांधवांनी घोषणाबाजी करीत धडक मारली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची चर्चाही झाली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता कोळी समाजबांधवांची बैठक आयोजित केली आहे.
२८ जून २०२४ रोजी दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्र्यांसोबत समाजबांधवांची बैठक घ्यावी, जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढावीत यासह अन्य मागण्यांवर यावेळी चर्चा
करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्थानिक पातळीवरच्या कोळी समाज शिस्टमंडळाची जिल्हाधिकारी यांचा सोबत मागण्यांवर योग्य सकारात्मक निर्णय घेतला आहे. याशिवाय अमळनेर, जळगाव, भुसावळ व फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना जात प्रमाणपत्राच्या प्रकरणांना निकाली काढण्यासाठी तत्काळ सचना दिल्या जातील.त्याच प्रमाणे प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत तपशीलवार शुक्रवारी सकाळी ११ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मागणीनुसार जळगावात अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय लवकरच जळगावात सुरु करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, त्यानंतर कोळी समाज बांधव माघारी परतले.
यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे,जितेंद्र सपकाळे, ऍड.अमित सोनवणे, मंदा सोनवणे, मुकेश सोनवणे, पंकज सपकाळे, भगवान सोनवणे, संदीप कोळी, सुभाष सोनवणे, महेश सोनवणे, डिगंबर सपकाळे, विशाल सपकाळे, भाऊसाहेब सोनवणे, बाळासाहेब सैंदाणे, खेमचंद कोळी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button