मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात चोपडा विधानसभा मतदार संघात ६१ कोटीची कामे मंजूर !
ग्रामीण भागातील ४० किमीचे रस्त्यांचा होणार कायापालट : आ. लताताई सोनवणे
चोपडा |
तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाला असून, तिसऱ्या टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. आ.लता चंद्रकांत सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे चोपडा मतदार संघात ४०.५२० किमीच्या रस्त्यांसाठी ५६ कोटी ७० लक्ष व देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी ७५ लक्ष असा एकूण सुमारे ६१ कोटी ४५ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे चोपडा व यावल तालुक्यातील रस्त्यांचा काय पालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना धन्यवाद दिले आहे.
आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स, उपमुख्यमंत्री अजित पवार , ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन साहेब व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मदत व पुनर्वसन मंत्री अनिलपाटील यांचे आभार मानले आहेत
*मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर कामे*
१) गोरगावले बु. ते धनवाडी रस्ता ( २. ८०५ कि. मी – ४ कोटी १३ लक्ष )
२) मंगरूळ ते गोरगावले खू. रस्ता ( १. ९०० कि. मी – २ कोटी ८९ लक्ष )
३) तावसे बु.- मजरेहोळ ते रामा -११ रस्ता ( ६. ८४० कि.मी – ९ कोटी ४४ लक्ष )
४) देवगाव ते पुनगाव ( ४. ६२० कि. मी – ८ कोटी ३६ लक्ष )
५) चोपडा ते चहार्डी रस्ता ( ५. ३७५ कि.मी – ८ कोटी ९ लक्ष )
६) प्रजिमा ०५- चुंचाळे ते कर्जाने रस्ता ( ७. ५०० कि.मी – ११ कोटी ७९ लक्ष )
७) धानोरा ते मोहरद रस्ता ( ३. ७१० कि.मी – ३ कोटी २९ लक्ष )
८) दहीगाव ते मोहराळा रस्ता ( २. ९४० कि.मी – ३ कोटी ३९ लक्ष )
९) विरावली ते वढोदे रस्ता ( २. ८१० कि.मी – २ कोटी ३३ लक्ष )
१०) मनवेल ते पिळोदे खु. रस्ता ( २. ०२० कि.मी – २ कोटी ९५ लक्ष ) असा एकूण ६१ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
चोपडा मतदार संघात १० रस्त्यांच्या ४०. ५२० कि.मी रस्त्यांसाठी ५६ कोटी ७० लक्ष ९२ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे व देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी ७५ लक्ष १ हजार एकूण सुमारे ६१ कोटी ४५ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आलेलाआहे. यामुळे चोपडा व यावल तालुक्याच्या रस्त्यांचा कायपालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आ. लता सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, ग्राम विकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब व मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील यांचे आभार मानले.