राष्ट्रीय परिषदेस गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात प्रारंभ
परिषदेसाठी देशभरातील ५५० प्रतिनीधींची उपस्थिती
जळगाव – गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे नाविन्यपूर्ण नर्सिंग शिक्षणातील सुधारणा आणि क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये उत्कृष्टता या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे गुरूवारी मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. दरम्यान दोन दिवसीय परिषदेसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील ५५० प्रतिनीधींची उपस्थिती लाभली आहे.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे ब्रिजिंग द गॅपः नाविन्यपूर्ण नर्सिंग शिक्षणातील सुधारणा आणि क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये उत्कृष्टता या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या सुरूवातीला संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. आय. क्लेमेंट (बंगळुरू), डॉ. लॅरिसा मातरा (बंगळुरू), डॉ. जमुना राणी (पश्चिम बंगाल), डॉ. रीटा लखानी (मुंबई), डॉ. रवींद्र एच. एन. (गुजराथ), डॉ. नेसा सत्या (मंगळुरू), डॉ. मोहम्मद हुसेन (नाशिक, महाराष्ट्र), वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्राचार्या विशाखा गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते.