ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

निवडणुकी पूर्वी शरद पवार गटाला धक्का , राष्ट्रवादीच्या 25 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

अमरावती |
राज्यात विधानसभा निवडणूक आता अगदी जवळ आली असून कोणत्याही क्षणी आचारसहिंता लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकीकडे शरद पवार गटात इनकमिंग सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अमरावतीतील तब्बल २५ पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिले.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमरावती जिल्हाध्यक्ष पदावरून प्रदीप राऊत यांना पायउतार केल्याने शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी बंडाचे हत्यार उपसले असून आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे विधानसभेपूर्वी अमरावतीत शरद पवार गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रदीप राऊत यांच्याकडे अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाची प्रमुख जबाबदारी होती. मात्र विधानसभा पूर्वी निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. तसेच त्यांच्याकडे प्रदेश संघटन सचिव ही नवी जबाबदारी देण्यात आली. यामुळे राऊत यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज झाले.
त्यांनी तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिले. पक्षाने आपल्याला विश्वासात न घेता पदावरून काढलं, अशी प्रतिक्रिया देत प्रदीप राऊत यांनी बंडाचे हत्यार उपसलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button