पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ;शहरात महिला मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

जळगाव,३० मे २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्ष महोत्सवानिमित्त जळगाव शहरातील महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आज दिनांक ३० रोजी सकाळी केले होते.
जलसिंचन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ केला.
तत्पूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माझ्यासह ना. गिरीश महाजन, जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे,माजी महापौर भारती सोनवणे,भाजप जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जैन उद्योग समूहाचे अशोकभाऊ जैन, भाजप जळगाव जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, अॅड. रोहित निकम, भाजप माजी महानगराध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, दीपमाला काळे, अॅड. शुचिता हाडा, भाजप महानगरातील मंडळाचे पदाधिकारी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये विजेते ठरलेले स्पर्धक:
१५ वर्षांपर्यंत गट – सुहानी कस्तेकर, मयुरी महाले, ऐश्वर्या नाईक
१६ ते ३५ वर्षे वयोगट – जानवी रोझोदे, तैय्यबा तडवी
३५ वर्षांपेक्षा अधिक वयोगट – ममता सपकाळे, रेखा शर्मा
या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. विजय पाटील, प्रा. इकबाल मिर्झा आणि संजय मोते यांनी काम पाहिले.
याप्रसंगी सायकलिंग करणाऱ्या कामिनी धांडे आणि विविध राज्यांमध्ये मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्याताई बेंडाळे यांचा मंचावर मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.