क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाग्यश्री नवटके यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल

तपासात अनियमितता असल्याचा आरोप

जळगांव |
जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याचा ठपका ठेवत आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्याविरुद्ध सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे.
भाग्यश्री नवटके आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपी म्हणून कार्यरत असताना जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी राज्य सहकारी पतसंस्थेत १२०० कोटींचा घोटाळा झाला होता. २०१५ मध्ये बीएचआर घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात फिक्स डिपॉझिटवर आकर्षक व्याजाचं आश्वासन देण्यात आलं होतं. यानंतर बँकेकडून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली होती.

या घोटाळ्याचा तपास भाग्यश्री नवटके यांनी केला होता, मात्र तपासात अनियमितता असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ऑगस्ट २०२४ मध्ये या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. सीबीआयने याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. आयपीएस भाग्यश्री नवटके या आता चंद्रपूरमध्ये राज्य राखीव पोलीस दलात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button